Sunday 15 April 2012

{ माझे काय चुकले }

                        { माझे काय चुकले } 
 
 
 
      
 
 
 
 
सांग ना ग " आई "
माझे काय चुकले ,
काबर तुम्ही दोघांनी 
मला उकिरड्यावर फेकले ......
 
देवा जवळ मी 
करत होते प्रार्थना 
असेच आई - बाबा 
मिळू दे  सर्वाना.........
 
माझा जन्म होई पर्यंत
तुम्ही मला खूप जपले
जन्म झाल्यावर मात्र
मला दोघांनीही उकिरड्यावर फेकले ......
 
मी काही तुम्हाला
" चॉंकलेट " नव्हते माघीतले
मी काही  तुम्हाला
" हुंड्यासाठी " ओझे नव्हते झाले ......
 
कारण आजची मुलगी ही नाही " अबला " 
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनी  जाते " कामाला "
मग काबर तुम्ही मला उकिरड्यावर फेकले
खरच सांग आई माझे काय चुकले ........
 
 
मला कधी कधी आजच्या या जास्त आणि उच्च शिक्षित पिढीचा काही गोष्टीचा खूप राग येतो.
कारण आजही आपल्या देशात, समाजात, परिसरात, काही पुरातन चाली - रिती पूर्वी प्रमाणे आजही
चालू आहेत. आज आपण चंद्रावर जात आहोत पण आपल्या आजू - बाजूला बघितले किवा वर्तमानपत्रात
वाचले, तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.
मुलगी जन्मायेण्या आगोदरच मातेच्या गर्भात तिला मारून टाकण्यात येते, किवा एखाद्या उकिरड्यावर
फेकून देण्यात येते. त्या निरागस बालकाचे ( मुलीचे ) यात काय चुकले,
 
काबर तिला उकिरड्यावर फेकण्यात येते.
 
काबर तिचा आदर करण्यात येत नाही.
 
काबर तिला सन्मानाने वागवू शकत नाही.
 
तिला उकिरड्यावर फेकण्यापूर्वी जरा विचार करा,
 
तीला गर्भातच मारण्यापूर्वी जरा विचार करा,
 
तिला मान-सन्मान न देण्यापूर्वी जरा विचार करा,
 
तिच्यावर अत्याचार करण्यापूर्वी जरा विचार करा,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या आईला,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या वडिलांना,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या पतीला,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या पत्नीला,
 
की तुमचा जन्म होण्यापूर्वी जर तुमच्या आईला, म्हणजेच तुमच्या आईचा जन्म झाल्या झाल्या
जर तिला असेच उकिरड्यावर फेकून दिले असते, तर काय झाले असते.
 
कुठे राहिला असता तुम्ही,
 
काय खाल्ले असते तुम्ही,
 
किवा जन्म तरी झाला असता का तुमचा.
 
जरा विचार करा,
 
" उठा आणि जागे व्हा " आधी " स्वत बदला मग  जग बदला "
 
!! मुलगी आसो या मुलगा !! 
!! समान अधिकार देवू दोघा !!
 
 
राज सोनगिरे

No comments:

Post a Comment