Friday 6 April 2012

{ जेथे श्री रामाचे नाम तेथेच हनुमान }

 {  जेथे श्री रामाचे नाम तेथेच हनुमान }
 
 
 
      
 
 
 
 

हनुमान जयंती विशेष
 
 
 
 
माझे भक्त जिथे माझे नामस्मरण करतात, तिथेच मी आहे'
हे भगवंत श्री कृष्णानी गीतेत दिलेले वाचन अनेकांच्या तोंडी
आहे. भगवंताच्या याच वाचनाची प्रचीती हनुमंताशी निगडीत
अन संत तुलसीदासांच्या चारित्र्यातील कथा देते. रामकथा
आणि प्रवचनाच्या माध्यमातून संत तुलसीदासांचे जीवन
राममय झाले होते. रोज पहाटे आन्हिक उरकल्यानंतर घरापाशी
असणाऱ्या एका पिंपळवृक्षाजवळच हात - पाय धुवायचे आणि
नंतर तांब्याभर पाणी या पिंपळवृक्षाच्या  बुंध्यावर टाकायचे.
यानंतर त्यांच्या तोंडून रसाळ रामकथा प्रकटू लागायची. हा 
क्रम अखंडपणे बारा वर्षे चालला अन एक दिवस नेहमीप्रमाणे 
सकाळच्या सुमाराला त्यांनी त्या पिंपळवृक्षाच्या  बुंध्यावर
तांब्यातले पाणी ओतले आणि काही क्षणात त्यांच्या समोर त्या
वृक्षावरचा ब्रम्हासंबंध प्रकट झाला. त्याची मुद्रा प्रसन्न होती.
या वृक्षावर बारा वर्षे पाणी वाहून तू कळत-नकळत जी माझी
सेवा केली त्यामुळे मी प्रकट झालोय. मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
तू हवं ते मग असं आश्वासनही त्या संबंधाने त्यांना दिले. या
प्रसंगाने काही क्षण स्तब्ध झालेल्या तुलसीदासांच्या तोंडून
रामदर्शनाची इच्छा प्रकटली. यावर तुझी ही इच्छा हनुमंतच
पूर्ण करू शकेल, असा मार्ग त्याने तुलसीदासांना सांगितला.
यावर त्यांच्या भेटीचा मार्ग विचारताच अरे साक्षात हनुमंत
तुझ्या रामकथेत रोज सर्वागाला कोड फुटलेल्या माणसाचे रूप
घेऊन सर्वाच्या आधी येतात आणि सर्वाच्या नंतर जातात,असं
सांगताच  तुलसीदासांना दुसऱ्या दिवशीची ओढ लागते. दुसऱ्या
दिवशी सर्वाच्या शेवटी बाहेर पडणाऱ्या हनुमंताच्या चरणांना
तुलसीदास घट्ट पकडून रामदर्शनाची याचना करतात. अनेक
तऱ्हेने हनुमंत त्यांची मीही तुझ्यासारखा माणूसच असल्याची
समजूत काढतात. अखेरीला तुलसीदासांच्या रामदर्शनाच्या
हट्टापुढे प्रसन्न होऊन त्यांना चीत्रकुटचा मार्ग सांगतात. तिथल्या
संत मेळ्यात आपल्या आराध्य देवताला प्रभू श्रीरामांनाच गंध
लावण्याचा महाभाग्ययोग  या महात्म्याच्या आयुष्यात येतो.
याच प्रसंगाचे स्मरण तुलसीदास करताना  दोन ओळीत हा प्रसंग
मांडतात. ते म्हणतात .....
 
" चित्रकुट के घाट पर भई संतन की भीड ! तुलसीदास
चंदन घिसे तिलक देत रघुवीर !! "
 
 जेथे अखंड रामकथा अन श्रीरामाचे नामस्मरण सुरु
असते त्याच ठिकाणी हनुमंताचे असणारे वास्तव्य जीवाची
आत्मारामाशी भेट कशी घडवून देते, याची प्रचीती देणारी
ही कथा हनुमंताची अत्यंत प्रिय गोष्ट कोणती हे सांगणारी
असल्याने या कथेला महत्व आहे. अन या पावनसुताची सर्वात
प्राणप्रिय गोष्ट म्हणजे श्रीरामाचे नाम. जेथे श्रीरामाचे नाम तेथेच
असे हनुमान. हे सूत्र सांगणाऱ्या कथेपासून मिळणारी नामप्रेरणा
महत्वाची आहे
          !! श्री राम जय राम जय जय राम !!
             !! जय जय जय बजरंगबली !!
 
                                    !! जय श्री राम जय हनुमान !!

No comments:

Post a Comment