Friday 27 April 2012

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Akshay Trutiya !! Posted by sachin

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Akshay Trutiya !!

अक्षय तृतीयेचे महत्त्व
          अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.

अर्थ
        सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.

मृतिका पूजन
        सदोदित कृपादृष्टि ठेवणार्‍या मृतिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्‍ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मृतिकेची उपासना करण्याचा दिवस.

मातीत आळी घालणे व पेरणी
        पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृतिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्‍त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
           (पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)

वृक्षरोपण
        अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व
        अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्‍यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्‍ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्‍ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Sunday 15 April 2012

{ !! श्री स्वामी समर्थ !! }

 { !! श्री स्वामी समर्थ !! } 
 
 
 
 
करून पहा.
 
१)स्क्रीन पासून थोडे लांब बसा.
 
२) इमेजवर क्लिक करून इमेज फुल्ल व्यू मधे ओपन करा.
 
३) नाकावर असलेल्या रेड डॉट कडे एकटक पहात १ ते २१
 
अंक मनात मोजा.
 
४) आता भिंतीकडे किंवा कोणत्याही प्लेन सर्फेस कडे पहा...
 
डोळ्यांची उघड झाप करू नका.
 
५) तुमचा अनुभव कॉमेंट मधे लिहा. शेअर करा.................
 
राज सोनगिरे

{ माझे काय चुकले }

                        { माझे काय चुकले } 
 
 
 
      
 
 
 
 
सांग ना ग " आई "
माझे काय चुकले ,
काबर तुम्ही दोघांनी 
मला उकिरड्यावर फेकले ......
 
देवा जवळ मी 
करत होते प्रार्थना 
असेच आई - बाबा 
मिळू दे  सर्वाना.........
 
माझा जन्म होई पर्यंत
तुम्ही मला खूप जपले
जन्म झाल्यावर मात्र
मला दोघांनीही उकिरड्यावर फेकले ......
 
मी काही तुम्हाला
" चॉंकलेट " नव्हते माघीतले
मी काही  तुम्हाला
" हुंड्यासाठी " ओझे नव्हते झाले ......
 
कारण आजची मुलगी ही नाही " अबला " 
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनी  जाते " कामाला "
मग काबर तुम्ही मला उकिरड्यावर फेकले
खरच सांग आई माझे काय चुकले ........
 
 
मला कधी कधी आजच्या या जास्त आणि उच्च शिक्षित पिढीचा काही गोष्टीचा खूप राग येतो.
कारण आजही आपल्या देशात, समाजात, परिसरात, काही पुरातन चाली - रिती पूर्वी प्रमाणे आजही
चालू आहेत. आज आपण चंद्रावर जात आहोत पण आपल्या आजू - बाजूला बघितले किवा वर्तमानपत्रात
वाचले, तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.
मुलगी जन्मायेण्या आगोदरच मातेच्या गर्भात तिला मारून टाकण्यात येते, किवा एखाद्या उकिरड्यावर
फेकून देण्यात येते. त्या निरागस बालकाचे ( मुलीचे ) यात काय चुकले,
 
काबर तिला उकिरड्यावर फेकण्यात येते.
 
काबर तिचा आदर करण्यात येत नाही.
 
काबर तिला सन्मानाने वागवू शकत नाही.
 
तिला उकिरड्यावर फेकण्यापूर्वी जरा विचार करा,
 
तीला गर्भातच मारण्यापूर्वी जरा विचार करा,
 
तिला मान-सन्मान न देण्यापूर्वी जरा विचार करा,
 
तिच्यावर अत्याचार करण्यापूर्वी जरा विचार करा,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या आईला,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या वडिलांना,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या पतीला,
 
विचारा स्वत : ला आणि आपल्या पत्नीला,
 
की तुमचा जन्म होण्यापूर्वी जर तुमच्या आईला, म्हणजेच तुमच्या आईचा जन्म झाल्या झाल्या
जर तिला असेच उकिरड्यावर फेकून दिले असते, तर काय झाले असते.
 
कुठे राहिला असता तुम्ही,
 
काय खाल्ले असते तुम्ही,
 
किवा जन्म तरी झाला असता का तुमचा.
 
जरा विचार करा,
 
" उठा आणि जागे व्हा " आधी " स्वत बदला मग  जग बदला "
 
!! मुलगी आसो या मुलगा !! 
!! समान अधिकार देवू दोघा !!
 
 
राज सोनगिरे

Friday 13 April 2012

{ गर्भातील मुलीचे काही अनुत्तरीत प्रश्न }


 


     { गर्भातील मुलीचे काही अनुत्तरीत प्रश्न  }     
     
 
 स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी, 
प्रेमिकेसाठी घेतो प्रियकर, उंच उंच भरारी, 
मग सांगा, ताईविना दादा अन मुलीविना पालक, 
हि कहाणी नाही का अधुरी.........  ? 
 
 
बाबांसाठी मुलगी असते स्वप्नातली परी, 
लेकच हवी हा आग्रह कोणी न धरी, 
जिवंत स्त्री गर्भाचा जन्मापूर्वी अंत करी, 
मग सांगा, राक्षसच नांदतो ना यांच्या अंतरी.........  ? 
 
 
जन्म घेतला जिच्या पदरी, 
ती एक मुलगीच, हे हि तो विसरी, 
वंशाचा दिवा हवा आहे दारी, 
मग सांगा, फक्त एका मुलासाठी, 
आणखी किती लेकी धाडणार देवाघरी........  ? 
 
 
मुलगी असते धनाची पेटी, 
प्रकाश देणारी जीवन ज्योती, 
मुलागीशिवाय समाजाची होईल का हो प्रगती, 
मग सांगा, कधी मिटणार हि भेदभावाची दरी........ ? 
 
राज  सोनगिरे ******

Wednesday 11 April 2012

{ लग्नाच्या आधी " तो " आणि " ती " }

       {  लग्नाच्या आधी " तो " आणि " ती "  }
 
 
 
    
 
 
 
तो :-  शेवटी तो दिवस आला.
 
ती :-  तू मला सोडूनतर जाणार नाहीसना ,
 
तो :-  नाही ना .
 
ती :-  तुझे माझ्यावर प्रेम आहेना,  
 
तो :-  आहे ना.
 
ती :- तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी नाहीना,
 
तो :-  शक्यच नाही  
 
ती :-  " आय लव यु " चाल आपण आत्ताच लग्न करू.
 
लग्ना नंतर हेच खालून वर वाचा ..............
 
राज सोनगिरे

Sunday 8 April 2012

{ तुझा चेहरा }

             { तुझा चेहरा }   
 
 
 
 
तू समोर असलीस की,
बोलायचं टाळतोय,
असे करण्याचा अर्थ,
तुला कुठ कळतोय....
 
 
                     गोड दिसतोय तुझा चेहरा,
                     तू थोडस हसल्यावर,
                     सारखा आठवतो मला तुझा चेरा,
                      मी एकांतात बल्यावर....
 
 
नभातल्या चांदण्या,
खाली येउनी पसरल्या,
तुझा मनमोहक चेहरा पाहुनी,
चंद्रालाही विसरल्या....
 
 
                      तुझ्या चेहऱ्याशिवाय,
                      काहीच बघावेसे वाटत नाही,
                      तू समोर नसलीस की,
                      जगावेसे वाटत नाही....
 
 
धडपडतो आहे मी,
तुझा चेहरा पाहण्यासाठी,
साथ मला तू देशीलका,
हे सुंदर जीवन जगण्यासाठी....
 
 
                       वेड मला लाविले,
                       या तुझ्या सुंदर चेहऱ्याने,
                       तू समजूनी घे माझिया मनाच्या,
                       भावना या प्रेम कविताने..........
राज सोनगिरे
मो :- 9730530394

Friday 6 April 2012

{ जेथे श्री रामाचे नाम तेथेच हनुमान }

 {  जेथे श्री रामाचे नाम तेथेच हनुमान }
 
 
 
      
 
 
 
 

हनुमान जयंती विशेष
 
 
 
 
माझे भक्त जिथे माझे नामस्मरण करतात, तिथेच मी आहे'
हे भगवंत श्री कृष्णानी गीतेत दिलेले वाचन अनेकांच्या तोंडी
आहे. भगवंताच्या याच वाचनाची प्रचीती हनुमंताशी निगडीत
अन संत तुलसीदासांच्या चारित्र्यातील कथा देते. रामकथा
आणि प्रवचनाच्या माध्यमातून संत तुलसीदासांचे जीवन
राममय झाले होते. रोज पहाटे आन्हिक उरकल्यानंतर घरापाशी
असणाऱ्या एका पिंपळवृक्षाजवळच हात - पाय धुवायचे आणि
नंतर तांब्याभर पाणी या पिंपळवृक्षाच्या  बुंध्यावर टाकायचे.
यानंतर त्यांच्या तोंडून रसाळ रामकथा प्रकटू लागायची. हा 
क्रम अखंडपणे बारा वर्षे चालला अन एक दिवस नेहमीप्रमाणे 
सकाळच्या सुमाराला त्यांनी त्या पिंपळवृक्षाच्या  बुंध्यावर
तांब्यातले पाणी ओतले आणि काही क्षणात त्यांच्या समोर त्या
वृक्षावरचा ब्रम्हासंबंध प्रकट झाला. त्याची मुद्रा प्रसन्न होती.
या वृक्षावर बारा वर्षे पाणी वाहून तू कळत-नकळत जी माझी
सेवा केली त्यामुळे मी प्रकट झालोय. मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
तू हवं ते मग असं आश्वासनही त्या संबंधाने त्यांना दिले. या
प्रसंगाने काही क्षण स्तब्ध झालेल्या तुलसीदासांच्या तोंडून
रामदर्शनाची इच्छा प्रकटली. यावर तुझी ही इच्छा हनुमंतच
पूर्ण करू शकेल, असा मार्ग त्याने तुलसीदासांना सांगितला.
यावर त्यांच्या भेटीचा मार्ग विचारताच अरे साक्षात हनुमंत
तुझ्या रामकथेत रोज सर्वागाला कोड फुटलेल्या माणसाचे रूप
घेऊन सर्वाच्या आधी येतात आणि सर्वाच्या नंतर जातात,असं
सांगताच  तुलसीदासांना दुसऱ्या दिवशीची ओढ लागते. दुसऱ्या
दिवशी सर्वाच्या शेवटी बाहेर पडणाऱ्या हनुमंताच्या चरणांना
तुलसीदास घट्ट पकडून रामदर्शनाची याचना करतात. अनेक
तऱ्हेने हनुमंत त्यांची मीही तुझ्यासारखा माणूसच असल्याची
समजूत काढतात. अखेरीला तुलसीदासांच्या रामदर्शनाच्या
हट्टापुढे प्रसन्न होऊन त्यांना चीत्रकुटचा मार्ग सांगतात. तिथल्या
संत मेळ्यात आपल्या आराध्य देवताला प्रभू श्रीरामांनाच गंध
लावण्याचा महाभाग्ययोग  या महात्म्याच्या आयुष्यात येतो.
याच प्रसंगाचे स्मरण तुलसीदास करताना  दोन ओळीत हा प्रसंग
मांडतात. ते म्हणतात .....
 
" चित्रकुट के घाट पर भई संतन की भीड ! तुलसीदास
चंदन घिसे तिलक देत रघुवीर !! "
 
 जेथे अखंड रामकथा अन श्रीरामाचे नामस्मरण सुरु
असते त्याच ठिकाणी हनुमंताचे असणारे वास्तव्य जीवाची
आत्मारामाशी भेट कशी घडवून देते, याची प्रचीती देणारी
ही कथा हनुमंताची अत्यंत प्रिय गोष्ट कोणती हे सांगणारी
असल्याने या कथेला महत्व आहे. अन या पावनसुताची सर्वात
प्राणप्रिय गोष्ट म्हणजे श्रीरामाचे नाम. जेथे श्रीरामाचे नाम तेथेच
असे हनुमान. हे सूत्र सांगणाऱ्या कथेपासून मिळणारी नामप्रेरणा
महत्वाची आहे
          !! श्री राम जय राम जय जय राम !!
             !! जय जय जय बजरंगबली !!
 
                                    !! जय श्री राम जय हनुमान !!

Thursday 5 April 2012

{ तुझा सहवास }

               { तुझा सहवास }
 
 

सळसळ वाहते हवा
हवेत आहे शीतल गारवा
मला फक्त तुझाच सहवास हवा....... 
 
                
                  ब्रम्हदेवाने बांधल्या आपल्या रेशीम गाठी 
                 मी आतुर झालो आहे तुझ्या प्रेमासाठी
                 माझ्या हातात तुझाच हात हवा
                आणि मला फक्त तुझाच सहवास हवा ........
 
 
पाण्याविन मासा तळमळतो जसा
तुला बघण्यासाठी मी घुटमळतो तसा
सुखी संसाराचा घेवूया वसा
संसार थाटवूया राजा - राणी जेसा
यासाठी मला फक्त तुझाच सहवास हवा .....
 
                                 तुझा आणि फक्त तुझाच ...........
 
राज सोनगिरे
मोबाइल नंबर :-  ९७३०५३०३९४

Wednesday 4 April 2012

{ गरिबीचा एक शाप }

     { गरिबीचा  एक शाप }
 
 
 
 
 
 
मी शिकत होतो
ती ही शिकत होती
कळत नकळत दोन मनाची
जुळून गेली नाती
 
 
              प्रेमाच्या या नात्याची
              न्यारीच ओढ होती
             तिची प्रत्येक भेट
             माझ्यासाठी गोड होती
 
 
दिवसा मागून दिवस गेले
संपत आले कॉलेज लाईफ
मग मी तिला विचारले
होशिलका माझी वाईफ ?
 
 
          ती बोलली मला मग
          आझुन तुला नौकरी नाही
          एवढ्या लवकर का
          करतोस लग्नाची घाई ?
 
 
चार पेसे कमवायला शिक
स्वतच्या पायावर उभे रहा
मगच वेड्या लग्न कर
आणि सुखी संसारची स्वप्न पहा
 
 
         एक मात्र लक्षात ठेव
         माझ्यावर विसंभून राहू नकोस
         जीवनसाथी समजून मला
         उगीचच स्वप्न रंगवू नकोस
 
 
तुझ्या सारख्या गरीबाशी
लग्न मी करणार नाही
पेशावीन प्रेम तुझे
आयुष्यभर पुरणार नाही
 
   
 
        उपदेश्याचे डोस पाजुनी
       तिने मला आस नकार दिला
       पेसा म्हणजे सर्व काही
       पण गरिबीचा शाप दिला.......
 
 
राज सोनगिरे
मोबाइल नंबर :- ९७३०५३०३९४