Thursday 1 March 2012

माझ्या बालपणाची गोष्ट

                                                                     माझ्या  बालपणाची  गोष्ट
 
माझ्या बालपणाची गोष्ट आहे
माझ्या मामाचे गाव खूप मोठे आहे आसे नाही, पण मामाच्या गावची नधी खूप मोठी आहे.
उन्हाळ्याच्या सुटीत मी व माझे भावंड दरवर्षी मामाच्या गावी जात  आसे. 
आम्ही सर्व मुले आणि मुली खूप खूप नवीन नवीन खेळ खेळत असे, खूप धिंगाणा करत,
आणि रात्रीच्या वेळी आजी आजोबा भोवती घोळका करून गोष्टी ऐकण्यासाठी
बसत असे. ऐक दिवस गोष्ट ऐकत असताना रात्रीचे दहा साडे दहा वाजले,
आणि तेवढ्यात लाईट गेली. 
शेजारचा गणेश  सायकलची घंटी ट्रिंग ट्रिंग वाजवत येऊन आजोबा जवळ थांबला.
आजोबांनी त्याला विचारले कुठ चाललार पोर ऐवढ्या रात्रीच,
गणेश :- कुठ नाही बाबा जरा  शेतात बरी देऊन येतो.
आजोबा :- आर पण तुझा बा कुठ हाय.
गणेश :- बा ला जरा ताप आला हाय म्हणून म्या ऐकठाच जात हाय.
आजोबा :- जरा सांभाळून  जा रस्त्यान म्हष्यान  लागत  अन नधी भी  हाय.
गणेश :- सायकल हायकी माझ्या संगतीला लोखांड जवळ असल्यावर भूतबित काही करत नाय.
आजोबा :- पायात काही घातल्स्का नाय.
गणेश :- घात्लीकी बाची नवी सिल्पर चप्पल.
आजोबा :- जार  बाबा सांभाळून.
आणि गणेश सायकलची घंटी वाजवत निघूनही गेला. रात्रखूप झाल्यामुळे आजोबांनी गोष्ट थांबवून
आम्हाला झोपायला सांगितले व आम्ही झोपीगेलो.
इकड गणेशची बारीदेने संपल्यावर गणेश शेतातून घराकडे निघाला.
रात्रीची वेळ आसल्यान त्याला रस्त्यात पडलेली काटे काही दिसली नाही व त्या काट्यांवरून सायकलचे चाकगेले
व ती सायकल पंमचर झाली त्यामुळे गणेशने सायकल शेतातच ठेवली व पायी घराकडे निघाला.
चालत असताना त्याला आजोबाचे बोलणे आठवले.......
"सांभाळून जार बाबा रस्त्यान म्हष्यान हाय आन नाधीभी हाय"....
चालता चालता नधी ओलांडली आणि त्याला  पाठीमाघून कोणीतरी बारीक बारीक खडे मारत असल्याचे समजले.
तो माघे वळून बघतोतर कोन्हीच नव्हते, तो परत चालायला लागला की परत खडे मारल्याचा त्याला भास होत
असे.
त्यामुळे तो खूप घाबरला आणि जोरात पळू लागला, तसे तसे खडे जोर जोरात त्याला लागत होते.
गावजळ आल्यावर  थोडे थांभून चालायला लागला,
त्याला कोणीतरी सांगितले होतेकी कुत्र्यानासुधा भुते दिसतात....
गावाच्या वेशीपाशी आल्यावर त्याला बघून कुत्रे भून्कुलागली, त्यामुळे गणेश खूप घाबरून जोरात पळू लागला,
गणेशला पळताना पाहून भुंकणारे कुत्रे गणेशच्या पाठीमाघे लागली व त्याला चावायला लागली.
त्यामुळे तो खूप जोरजोरात ओरडूलागला,
त्याचा आवाज ऐकून गावातील लोक जागी झाली, लोकांना वाटलेकी गावात कोन्ही चोर शिरलेत.
लोक गणेशला मारणार तेवढ्यात लाईट आली, व गणेशचा चेहरा बघून सगळे लोक त्याला विचारू लागलिकी,
एवढ्या रात्रीच कुठ फिरत होता, कुत्रे तुझ्या माघे कशी लागली,का  चोरीबिरी  करत होता.
आशा प्रश्नान गणेश बेशुद्ध झाला.
शुद्धीवर आल्यावर त्याला विचारले कि तो रात्रीचा प्रसंग आठवायचा, आणि परत बेशुद्ध पडायचा.
त्याला  डॉक्टरकडे दाखवले सर्व इलाज केले पण काहीच फरक पडत नवता.
कोणी म्हणे कि याला भूत बाधा झाली, आंगरे धुपारे चालुकरा त्या उपायान त्याला थोड बरेवाटे, पण कीही उपयोग
नावथा.
पाच सहा दिवसाने हि गोष्ट गावातील एका शिक्षकाना समजली, ते सरळ गणेशला भेटले व सर्व परीस्तीती माहित करून
घेतली.
नंतर ते स्लीपर चप्पल घालून गावातील नधीत गेले, पहिले बिगर चप्पल्चे चालेले खडे लागले नाहीत,
नंतर चप्पल घालून चालले  तर पाठीमाघून खडे लागले,
जोरात पळालेतर खडे जोरात लागत होते.
ते सरळ गणेशच्या घरीआले  व गणेशला सांगू लागलेकी तुला ज्या भुताने झपाटले आहे,  
त्या भूताला मी  नाधीत बांधून आलो आहे चाल तुला मी ते भूत दाखवतो.
नंतर गणेश व गावातील इतर लोक सरांच्या माघे माघे नाधीत गेले,
सरांनी सर्व लोकांना व्येवस्तीत समजावून सांगितले की, 
नाधीतील पाण्याने चप्पल ओलीहोते आणि त्यामुळे किनाऱ्यावरील  वाळू  चप्पलीला चिटकून वर उडते, 
व आपल्याला पाठीमाघून लागते  आणि रात्रीची वेळ  असल्याने  गणेश पहिलेच घाबरला होता. 
त्यात कुत्रे भुंकत होते, गणेश पळत असल्याने कुत्रे गणेशच्या पाठीमाघे लागून चावत होती......... 
सरांचे हे उत्तर ऐकून सर्व लोक जोर जोरात हासू लागली.
                                                                         {  सामाफ्त }
                                                  
                                                               {   ||  श्री स्वामी समर्थ  ||   }
 
आशा प्रकारे जर सर्वांनी डोके वापरून  काम केले तर आज आपल्याला कोणत्याही मांत्रिकाकडे जाण्याची वेळ येत नाही. 
प्रतेक मनुष्याला माझे एकच सांगणे आहे की आजच्या इंटरनेट युगात आसे कोणतेही भूत बाधा  कारणी-कौटाळी
जादू-टोना आस्तित्वात नाही आपण फक्त एकच करा,
देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा बाकी सर्व व्यर्थ आहे
आपणास ही गोष्ट कशी वाटली ते जरूर कळवा
 
आपला
 
राज सोनगिरे        
 मोबाईलनंबर :- ९७३०५३०३९४
 
       
       

No comments:

Post a Comment